धारावीत गोडाऊनला लागलेली आग विझविण्यात फायर ब्रिगेडला यश; जिवीतहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 15:23 IST2017-09-15T10:01:07+5:302017-09-15T15:23:31+5:30

 धारावीतील गोडाऊनला लागलेली ही आग विझविण्यात फायर ब्रिगेडला यश आलं आहे.

Fire in Dharavi Transit Camp; Fire Brigade eight trains | धारावीत गोडाऊनला लागलेली आग विझविण्यात फायर ब्रिगेडला यश; जिवीतहानी नाही

धारावीत गोडाऊनला लागलेली आग विझविण्यात फायर ब्रिगेडला यश; जिवीतहानी नाही

ठळक मुद्दे धारावीतील गोडाऊनला लागलेली ही आग विझविण्यात फायर ब्रिगेडला यश आलं आहे.आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचं समजतं आहे.

मुंबई, दि. 15- धारावीत एका गोडाऊनला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली होती. धारावीतील गोडाऊनला लागलेली ही आग विझविण्यात फायर ब्रिगेडला यश आलं आहे. आगीत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसल्याचं समजतं आहे. गोडाऊनला आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. फायर ब्रिगेडच्या शर्थीच्या प्रयत्नाने एका आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. 

घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या. चार वॉटर टँकर आणि एक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झालं होतं. शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही आग लागली होती. 


काही महिन्यांपूर्वी धारावीतील एका इमारतीमध्ये भीषण आग लागली होती.  व्ही.ओ.सी. टॉवर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. या घटनेत आग लागलेल्या खोलीतील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झालं. सुदैवाने घराला कुलूप असल्याने मोठी जिवीतहानी टळली. जर या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला असता तर इमारतीचा चौथा माळा उध्वस्त झाला असता. या घटनेची फायर ब्रिगेडला माहिती मिळाल्यानंतर तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पण तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झालं होतं.

Web Title: Fire in Dharavi Transit Camp; Fire Brigade eight trains

टॅग्स :Accidentअपघात