Join us
Daily Top 2Weekly Top 5

विलेपार्ले येथील प्राईम मॉलला आग; एकाची प्रकृती चिंताजनक तर अग्निशमन दलाचा जवान झाला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:00 IST

Fire Caught at Prime Mall in Villeparle : मुबासिर मोहम्मद के असे या व्यक्तीचे नाव असून तो २० वर्षाचा आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगेश गावकर (५४) या अग्निशमन दलाचा जवान देखील किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा यांनी दिली.

मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेकडील प्राइम मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या १३ गाड्या आणि ८ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीच्या धुरामुळे गुदमरल्याने एका व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुबासिर मोहम्मद के असे या व्यक्तीचे नाव असून तो २० वर्षाचा आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मंगेश गावकर (५४) या अग्निशमन दलाचा जवान देखील किरकोळ जखमी झाला आहे, अशी माहिती कूपर रुग्णालयाच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा यांनी दिली.

लेव्हल ४ ची आग असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीची तीव्रता पाहता इर्ला मार्केट परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा परिसर गजबजलेला असून या परिसरात अनेक दुकाने आहेत. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या विक्रीसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळाली नाही. आग अतिशय वेगाने पसरत आहे. आज सकाळी १०. ३० वाजताच्या सुमारास ही आग लागली. 

टॅग्स :आगहॉस्पिटलअग्निशमन दलमुंबई