शाहरुख खानच्या मन्नतसमोरील इमारतीला आग; तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 11:15 IST2020-03-19T11:06:46+5:302020-03-19T11:15:04+5:30

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 

Fire burst in Sea Spring Bldg, Opp Mannat Bungalow; 1 dead hrb | शाहरुख खानच्या मन्नतसमोरील इमारतीला आग; तरुणीचा मृत्यू

शाहरुख खानच्या मन्नतसमोरील इमारतीला आग; तरुणीचा मृत्यू

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यासमोरील सी स्प्रिंग इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली. यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. 


बांद्रामधील बँडस्टँड परिसरात शाहरुख खानचा बंगला आहे. अगदी त्याच्याच समोरील इमारतीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. इव्हाना मोरेस या 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून सिफ्रा जाफरी (38) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचे भाभा हॉस्पिटलचे डॉ. राजू यांनी सांगितले. जाफरी या 90 ते 100 टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती खालावलेली आहे. 
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. 

Web Title: Fire burst in Sea Spring Bldg, Opp Mannat Bungalow; 1 dead hrb