वरळीतील साधना इमारतीची आग नियंत्रणात; अग्निशामक दलाचे 11 जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 22:31 IST2018-12-29T18:43:31+5:302018-12-29T22:31:10+5:30
घटनास्थळी 8 बंब, रुग्णवाहिका पाठवून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

वरळीतील साधना इमारतीची आग नियंत्रणात; अग्निशामक दलाचे 11 जवान जखमी
मुंबई : वरळीतील बीडीडी चाळीजवळील साधना इंडस्ट्रीअल इस्टेट या तीन मजली इमारतीला आज सायंकाळी 6 च्या सुमारास आग लागली. यामध्ये अग्निशामक दलाचे 11 जवान जखमी झाले आहेत.
साधना इमारतीच्या तळमजल्यावरील औषधे आणि रसायणांच्या साठ्याला आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाच्या जवानांनी दिली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी 8 बंब, रुग्णवाहिका पाठवून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Mumbai: Level-2 fire breaks out in Sadhana House behind Mahindra Towers in Worli area. Firefighting operations underway. More details awaited. pic.twitter.com/gv7ZKserkI
— ANI (@ANI) December 29, 2018
ही आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले असून वायरच्या साठ्याला आग लागल्याचे समजते. परिसरात धुराचे लोट दिसत आहेत. दिवसभरात जवळपासच्या परिसरात आग लागण्य़ाची ही दुसरी घटना आहे. सकाळी कमला मिल परिसरात आग लागली होती.
या आगीमध्ये अग्निशामन दलाचे जवान विशाल विश्वासराव (38) आणि स्वाती सातपुते (40) यांच्यासह धुरामध्ये गुदमरलेल्या 5 जवानांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आग विझविताना अग्निशामन दलाचे जवान विजय मालुसरे, रमेश हिरामन महाले, रमेश बाबर, बालाजी ढगे, राजू लिनार आणि सुबोध पेडणेकर हे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोतदार हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले.