Join us

Mumbai Fire: मुंबईत बोरिवली येथे रहिवासी इमारतीला भीषण आग, सातवा मजला जळून खाक; अग्निशमन दलाचा जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 13:02 IST

Mumbai Fire: मुंबईत बोरिवली येथे एका रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे.

Mumbai Fire: मुंबईत बोरिवली येथे एका रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. बोरिवली पश्चिमेकडील गांजावाला लेन परिसरातील गांजावाला रेसिडन्सी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली असून अग्नीशमन दलाच्या ३ ते ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

इमारतीचा सातवा मजला संपूर्णपणे जळून खाक  झाला आहे. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असताना अग्नीशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. संबंधित जखमी जवानाला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

टॅग्स :मुंबईआगअग्निशमन दल