Join us

वडाळ्यात पहाटे इमारतीत लागली आग; १५ जण गुदमरले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 17:22 IST

१५ जणांना परळ येथील के. ई. म. रुग्णालयात दाखल करण्यात आलं

ठळक मुद्दे १ तासातच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या प्रयत्नाला यश आलं.  सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटे चारपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आली होती.

मुंबई - वडाळा पूर्व येथील एका एसआरएच्या इमारतीत आज पहाटे आग लागली असून आगीमुळे १५ जण गुदमरल्याची माहिती मिळत आहे. या १५ जणांना परळ येथील के. ई. म. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत असून १ तासातच आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या प्रयत्नाला यश आलं. वडाळा पूर्व येथील श्री गणेश साई एसआरए इमारतीत आज सकाळी साडे तीनच्या सुमारास आगीने पेट घेतला होता. आगीचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नसून आग भडकताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या १५ जणांचा आगीच्या धुरामुळे श्वास कोंडला होता. त्यांना तात्काळ के.ई. म. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे उपचार सुरू असून या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटे चारपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आली होती.

 

टॅग्स :आगपुणे अग्निशामक दलपोलिस