Video : अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 12:29 PM2018-09-11T12:29:29+5:302018-09-11T14:04:03+5:30

अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटमधील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Fire broke out in a building, in Madhu Industrial Estate, Andheri East at 10 am today | Video : अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग

Video : अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये भीषण आग

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील मधू इंडस्ट्रीयला इस्टेटमधील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या भीषण आगीत अग्निशामक दलाचे अधिकारी योगेश शेलार जखमी झाले आहेत. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


मंगळवारी (11 सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास मधू इंडस्ट्रीयल इस्टेटमधील इमारतीमध्ये भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब आणि चार पाण्याचे टँकर्स तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तीन तासांनंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. आगीची तीव्रता वाढल्याने 15 गाड्या घटनास्थळी आहेत. या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.


Web Title: Fire broke out in a building, in Madhu Industrial Estate, Andheri East at 10 am today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.