मरोळ नाका येथील नवपाड्यात गोडावूनला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 23:37 IST2018-11-06T21:31:20+5:302018-11-06T23:37:39+5:30
लाकडी फर्निचरच्या कामासाठी तात्पुरती उभारण्यात आलेल्या गोडावूनला ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली.

मरोळ नाका येथील नवपाड्यात गोडावूनला आग
मुंबई - अंधेरीतील मरोळ नाका येथील नवपाड्यातील गोडावूनला आज रात्री ८ वाजताच्या सुमारास आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी ४ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ४ पाण्याचे टँकर रवाना झाले असून आग नियंत्रणात आली आहे. अदयाप आग विझविण्याचे काम सुरु आहे. लाकडी फर्निचरच्या कामासाठी तात्पुरती उभारण्यात आलेल्या गोडावूनला ही आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, ही आग शमवण्यात यश आले आहे.
Mumbai: Level 2 fire breaks out in a bamboo godown at Navpada area of Andheri. Fire tenders at spot. No casualties reported. pic.twitter.com/Q88MZfiv5Q
— ANI (@ANI) November 6, 2018