Malad Fire: मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 12:25 IST2018-09-04T12:10:19+5:302018-09-04T12:25:52+5:30
Malad Fire: मालाड पश्चिमेतील सोमवार बाजार परिसरात लागली आग

Malad Fire: मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
मुंबई: मालाडमधील एका गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमल दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालाड पश्चिमेला असलेल्या सोमवारी बाजार परिसरात ही आग लागली आहे. या भागात अनेक लाकडांची गोदामं आहेत. त्यामुळे ही आग पसरण्याची शक्यता आहे.
मालाडमधील सोमवारी बाजार परिसरात असलेल्या एका गोदामाला आग लागल्याची घटना घडली. या भागात लाकडाची अनेक गोदामं आहेत. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग लागलेल्या परिसरात अनेक लहानमोठी दुकानं आहेत. हा भाग पश्चिम द्रुतगती मार्गापासून साधारणत: दोन किलोमीटर दूर आहे. आग लागलेल्या गोदामात कोणीही अडकल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.