Join us

Kamala Mills Compound Fire : कमला मिल्स कंपाऊंडमध्ये पुन्हा आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 12:45 IST

Kamala Mills Compound Fire : लोअर परेल परिसरात असलेल्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे.

मुंबई - लोअर परेल परिसरात असलेल्या कमला मिल्स कंपाऊंडमध्ये पुन्हा आग लागल्याची घटना घडली आहे. कमला मिल्स कपाऊंडमध्ये असलेल्या 'तमाशा' पबच्या मागील बाजूस असलेल्या व्हिक्टोरिया हाऊसमध्ये आग लागली होती. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शुक्रवारी (7 सप्टेंबर) सकाळी 11.03 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये थर्माकॉलच्या शिट्समुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. धुराचे मोठे-मोठे लोट परिसरात पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  

 

 

 

 

टॅग्स :कमलामिल्सआगकमला मिल अग्नितांडव