Mumbai Fire: भायखळ्यात ५२ मजली टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या शहरातील सर्व गाड्या घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:44 IST2025-02-28T11:43:52+5:302025-02-28T11:44:49+5:30

Mumbai Byculla Fire: दक्षिण मुंबईत भायखळा येथील सॅलसेट नावाच्या ५२ मजली उच्चभ्रू इमारतीला भीषण आग लागली आहे.

Fire Breaks Out In Byculla East Salsette Building Traffic Hit | Mumbai Fire: भायखळ्यात ५२ मजली टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या शहरातील सर्व गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire: भायखळ्यात ५२ मजली टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या शहरातील सर्व गाड्या घटनास्थळी

Mumbai Fire: दक्षिण मुंबईतभायखळा येथील सॅलसेट नावाच्या ५२ मजली उच्चभ्रू इमारतीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे भायखळा-परळ पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

सॅलसेट २७ नावाचा उच्चभ्रू ट्विन टॉवर भायखळ्यातील महागडा प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. यात प्रत्येकी ५२ मजली असे दोन टॉवर आहेत. त्यातील एका टॉवरमध्ये ४५ मजल्यावर आग लागली आहे. यात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळावर अग्निशमन दलासह रुग्णवाहिका, मनपा प्रशासन आणि मुंबई पोलिसांचीही एक तुकडी पोहोचली आहे. 

Web Title: Fire Breaks Out In Byculla East Salsette Building Traffic Hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.