Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! गोरेगावमध्ये ४५ मजली इमारतीत आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:21 IST

Mumbai Goregaon Fire: गोरेगाव पूर्व भागातील गोकुलधाम परिसरात असलेल्या डीबी वूड्स नावाच्या भव्य इमारतीत शुक्रवारी सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई

गोरेगाव पूर्व भागातील गोकुलधाम परिसरात असलेल्या डीबी वूड्स नावाच्या भव्य इमारतीत शुक्रवारी सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. डीबी वूड्स ही ४५ मजली असून इमारतीच्या ९ व्या मजल्यावर आग लागल्याचं सांगितलं जात आहे. नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. 

अग्निशमन दलाला सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी याबाबतची सूचना मिळाली. त्यानंतर ९ वाजून २५ मिनिटांनी आग लेव्हल-१ ची जाहीर करण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

प्राथमिक माहितीनुसार, आग इमारतीच्या ९ व्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या बेडरुममध्ये लागली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. आगीची माहिती मिळतात इमारतीतील रहिवाशांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. इमारतीच्या रेफ्यूजी एरियामध्ये नागरिकांना स्थानांतरित करण्यात आलं आहे. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fire Erupts in Mumbai High-Rise; Firefighters Respond, No Injuries

Web Summary : A fire broke out on the 9th floor of a 45-story building in Mumbai's Goregaon area. Firefighters responded quickly, managing to control the blaze. Residents were safely evacuated to the refuge area, preventing any casualties. The cause is suspected to be a short circuit.
टॅग्स :मुंबईआगअग्निशमन दल