वरळी नाका येथील भाजपच्या संपर्क कार्यालयानजीक आग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 20:59 IST2018-10-18T20:44:37+5:302018-10-18T20:59:42+5:30

भाजपचे कार्यालय आणि लोढा सुप्रीमस इमारती अगदी बाजूला असून ही आग आज सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास लागली आहे. 

Fire at BJP's office of Worli Naka | वरळी नाका येथील भाजपच्या संपर्क कार्यालयानजीक आग 

वरळी नाका येथील भाजपच्या संपर्क कार्यालयानजीक आग 

मुंबई -  वरळी नाका येथील लोढा भाजपचे संपर्क कार्यालयाशेजारी असलेल्या सुप्रीमस या इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी सुशोभीकरणासाठी लावलेल्या झाडा-झुडुपात अचानक आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी आग वीजविण्याचे काम करत असून आग आटोक्यात आली आहे. वरळी नाक्यावर फटाक्यांची आतषबाजी सुरु असताना त्याची ठिणगी झुडुपात पडल्याने ही आग लागली असावी अशी शक्यता अग्निशमन दलाने वर्तविली आहे. भाजपचे कार्यालय आणि लोढा सुप्रीमस इमारती अगदी बाजूला असून ही आग आज सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास लागली आहे. 

Web Title: Fire at BJP's office of Worli Naka