फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 22:16 IST2020-08-26T22:16:20+5:302020-08-26T22:16:58+5:30
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ५ फायर इंजिन, ५ जेटी आणि उर्वरित साधन सामुग्रीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते.

फोर्टमधील बाहुबली इमारतीला आग, एकजण जखमी
मुंबई : फोर्ट येथील बाहुबली इमारतीमध्ये बुधवारी रात्री सव्वा सातच्या सुमारास लागलेल्या आगीत दिपक दिलदार नावाची व्यक्ती ३५ टक्के भाजली. बॉम्बे रुग्णालयात जखमी व्यक्तीला दाखल करण्यात आले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ५ फायर इंजिन, ५ जेटी आणि उर्वरित साधन सामुग्रीच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले होते.
दक्षिण मुंबईतल्या फोर्टमधील ‘बाहुबली’ या इमारतीला आग लागली आहे. ही आग तळमजला आणि दुसऱ्या मजल्याला लागली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे एकजण जखमी झाला असून त्याला जवळील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?