Join us

विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 06:43 IST

मुंबई : विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी कक्षात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. कक्षात तपासणीसाठी ठेवण्यात ...

मुंबई : विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरील तपासणी कक्षात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. कक्षात तपासणीसाठी ठेवण्यात आलेल्या स्कॅनिंग मशीनमुळे ही आग लागली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तत्काळ धाव घेत अवघ्या ६ मिनिटांत आग नियंत्रणात आणली. परंतु, विधानभवन परिसरात यावेळी काही वेळ धुराचे लोट पाहायला मिळाले. 

  या घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. आदित्य ठाकरे यांच्यासह अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत स्कॅनिंग मशीनची पाहणी केली. 

६० ते ७० आमदार विधिमंडळात हाेतेसोमवारी विधानभवनात विधिमंडळ समित्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ६० ते ७० आमदार विधिमंडळात होते. समित्यांचे उद्घाटन झाल्यानंतर ही मान्यवर मंडळी भोजन करत असतानाच हा प्रकार घडला. अग्निशमन दलाने या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविले असले तरी विधानभवनाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी आणि विद्युत यंत्रणेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

विधानभवनाच्या तपासणी कक्षात स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. अग्निशमन दलाने ही आग काही मिनिटांत आटोक्यात आणली. सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. आता अग्निशामक दलाचे पथक आगीच्या कारणांचा शोध घेईल. राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष

टॅग्स :विधान भवनआगआमदार