अंधेरीत एसआरएच्या २२ मजली इमारतीला आग; दोघांचा गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 09:48 PM2018-11-13T21:48:40+5:302018-11-13T23:46:30+5:30

रहिवासी इमारत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी १० आणि ११ व्या मजल्यावर अडकलेल्या 5 पैकी ३ जणांना सुखरूप वाचवले.

Fire in the 22-storey SRA building in the dark | अंधेरीत एसआरएच्या २२ मजली इमारतीला आग; दोघांचा गुदमरून मृत्यू

अंधेरीत एसआरएच्या २२ मजली इमारतीला आग; दोघांचा गुदमरून मृत्यू

Next

मुंबई - अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोडवरील कदम नगर एसआरएच्या २२ मजली इमारतीला आज रात्री ८. ३० च्या सुमारास आग लागली आहे. ही आग १० आणि ११ व्या मजल्यावर लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. रहिवासी इमारत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी १० आणि ११ व्या मजल्यावर अडकलेल्या 5 पैकी ३ जणांना सुखरूप वाचवले आहे. तर दोन जणांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. 

 

या इमारतीमधील 10 व्या मजल्यावरील 1001 क्रमांकाच्या सदनिकेमध्ये ही आग लागली. यामध्ये इलेक्ट्रीक शॉर्टसर्किट झाल्याने लाकडी फर्निचर आणि इतर घरातील वस्तुंमुळे आग 11 व्या मजल्यापर्यंत पसरली. तसेच 21 व्या मजल्यालाही काही झळा बसल्या. 1001 या फ्लॅटमधील हॉलमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. विकी शर्मा (25), सागर शर्मा (07) असे मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे असून लालकृष्ण शर्मा (50) हे 30 टक्के भाजले आहेत. लालकृष्ण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी प्रकृती ठीक आहे. 

Web Title: Fire in the 22-storey SRA building in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.