Join us
Daily Top 2Weekly Top 5

रविवार सुट्टीच्या दिवशी काढले तब्बल दोनशेच्या वर जीआर; निधी खर्च करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 06:39 IST

आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी खर्च करण्याची घाई

मुंबई: आर्थिक वर्ष संपत असताना अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू झाली असून, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवसातही राज्य सरकारच्या विविध विभागांनी तब्बल २०७जीआर काढले आहेत. शनिवारी १०४ आणि रविवारी १०३ जीआर काढण्यात आले. विशेष म्हणजे रात्री उशीरापर्यंत ही लगबग सुरू होती. यातील बहुतांश जीआर हे निधी वितरणासंदर्भातील आहेत.

मागील आठवड्यात शुक्रवार पर्यत २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीच्या केवळ ६० टक्के निधी खर्च झाला होता. रविवारी रात्री उशीरापर्यंत हा आकडा ६३.८८ टक्क्यांपर्यंत गेला होता.

शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी सर्वच शासकीय कार्यालये निधी वितरणासाठी सुरू ठेवण्यात आली होती. आता आर्थिक वर्ष संपायला दोनच दिवस शिल्लक असल्याने राज्य शासनाच्या हातात निधी खर्च करण्यासाठी सोमवार आणि मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Government Issues GRs on Holiday to Spend Funds Quickly

Web Summary : Maharashtra government issued 207 GRs during the weekend holiday to expedite fund allocation. With only two days left in the fiscal year, departments are rushing to utilize allocated funds, reaching 63.88% expenditure.
टॅग्स :मंत्रालयमहाराष्ट्र सरकार