वृद्ध पालकांचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याला मिळणार आर्थिक साह्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 04:15 AM2018-12-21T04:15:25+5:302018-12-21T04:16:00+5:30

समुदायाच्या विस्तारासाठी योजना : ‘जियो पारसी’ उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

Financial Assistance for a Parent's Parents | वृद्ध पालकांचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याला मिळणार आर्थिक साह्य

वृद्ध पालकांचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याला मिळणार आर्थिक साह्य

Next

मुंबई : घरातील न कमावत्या ज्येष्ठांचा सांभाळ करणे अनेकांना आर्थिक दृष्टीने परवडणारे नसल्याने नकोसे वाटते. मात्र, केवळ या एका कारणामुळे जोडप्याने मुलांचा विचार न केल्यास समाजाची लोकसंख्या कमी होऊ शकते. आधीच जागतिक स्तरावर पारसी समुदायाची संख्या वेगाने घटत आहे. त्यामुळेच समुदायाच्या विस्तारासाठी ज्या जोडप्याला पहिल्या, दुसºया किंवा तिसºया मुलाचा विचार करायचा आहे आणि त्यांच्यावर ज्येष्ठांची जबाबदारी आहे अशांना दरमहा प्रत्येक ज्येष्ठ नागरिकामागे ४ हजार रुपये देण्याचा निर्णय ‘जिओ पारसी’ उपक्रमाच्या तिसºया टप्प्याअंतर्गत घेण्यात आला आहे.

जागतिक स्तरावर पारसी समुदायाची संख्या वेगाने घटत आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ‘जियो पारसी’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे. ग्रँट रोड येथील सर रतन टाटा इन्स्टिट्यूटमध्ये द परझोर फाउंडेशन आणि मॅडिसन बीएमबी यांनी बॉम्बे पारसी पंचायत, टीआयएसएस मुंबई आणि फेडरेशन आॅफ झोरोस्ट्रियन अंजुमन्स आॅफ इंडिया या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘जियो पारसी’च्या तिसºया टप्प्याचा प्रारंभ गुरुवारी करण्यात आला. यात तीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी पारसी समुदायाविषयी संशोधन करणारे संशोधकतज्ज्ञ अँटॉन झेकॉव्ह, मॅडिसन वर्ल्ड डायव्हर्सिफाय कम्युनिकेशन ग्रुपच्या कार्यकारी संचालक लारा बलसारा, वास्तुविशारद केयान के मिस्त्री उपस्थित होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री नौहीद सायरसी उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, हा उपक्रम समाज जीवनाच्या प्रत्येक घटकाशी जोडलेला आहे आणि यामुळे भविष्याबाबत आशादायी चित्र दिसत आहे. या उपक्रमाअंतर्गत तीन योजना सादर करण्यात आल्या. पहिल्या ‘क्रेश अँड चाइल्ड केअर सपोर्ट’ या योजनेअंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न १५ लाखांपेक्षा कमी आहे अशा जोडप्यांना प्रत्येक मुलामागे महिना ४ हजार रुपयांचे आर्थिक साह्य करण्यात येईल. अपत्य ८ वर्षांचे होईपर्यंत हे साह्य दिले जाईल. तर, ‘सीनियर सिटीझन आॅनरेरियम फॉर चाइल्ड केअर’ या दुसºया योजनेअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक समाजातील लहान मुलांची काळजी घेत आहेत, अशांना महिना ३ हजार रुपये मानधन देण्यात येईल. ही रक्कम प्रत्येक मुलामागे मूल १० वर्षांचे होईपर्यंत दिली जाईल.
तिसºया ‘सपोर्ट टू कपल्स टू एनकरेज एल्डरली डिपेंडण्ट्स व्हू स्टे विथ देम’ या योजनेअंतर्गत ज्या जोडप्याला पहिल्या, दुसºया किंवा तिसºया मुलाचा विचार करायचा आहे आणि त्यांच्यावर ज्येष्ठांची जबाबदारी आहे़ वार्षिक आर्थिक उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा कमी असलेली कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील.

आतापर्यंत १७२ बालकांचा जन्म

केंद्र सरकारने पारसी समुदायाची लोकसंख्या वाढण्यासाठी ‘जियो पारसी’ योजना २०१३मध्ये सुरू केली आहे. आजमितीस या योजनेंतर्गत १७२ पारसी बालकांचा जन्म झाला. तसेच तब्बल १०० जोडप्यांनी पहिल्या किंवा दुसºया मुलासाठी तयारी दर्शवली आहे. या मोहिमेंतर्गत पारसी तरुणांना संसार लवकर सुरू करण्यासाठी आणि वंध्यत्वावर उपचार करून घेण्यासाठी समुपदेशन करण्यात येते. १० लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या दाम्पत्यांना टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा मोफत वापर करून अपत्यप्राप्तीची संधीदेखील देण्यात आली.

तरुणपिढीसाठी विशेष योजना
पारसी समुदायाचे कमी होणारे प्रमाण ओळखून केंद्र शासनाने घेतलेला पुढाकार हे समुदायासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. ‘जियो पारसी’च्या तिसºया टप्प्यात तरुण पिढीसाठी विशेष योजना सुरु करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून समुपदेशन, आर्थिक सहाय्य, सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, तरुण- ज्येष्ठ नागरिक अशा दोन्ही घटकानां वित्तीय मदत करण्यात येणार आहे, त्यामुळे समुदायाला यातून निश्चितच लाभ मिळेल.
- डॉ. शेरनाझ कामा, अध्यक्षा, परझोर फाउंडेशन

दिनदर्शिकेतून जनजागृती
च्या कार्यक्रमात पहिली जियो पारसी दिनदर्शिका २०१९ चे अनावरण करण्यात आले. ही दिनदर्शिका जास्तीत जास्त तरुण पारसी मुलांपर्यंत पोहोचविली जाईल.
च्दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर तरुण पारसी मुलांना आनंददायी कुटुंब तयार करावे अशा आशयाचा संदेश दिलेला आहे.


 

Web Title: Financial Assistance for a Parent's Parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.