ताप, अंगदुखीचे ज्येष्ठांना टेन्शन, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना त्रास, ओपीडीत गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 12:17 PM2023-09-16T12:17:33+5:302023-09-16T12:18:03+5:30

Mumbai: गेल्या काही महिन्यांत विषाणूजन्य (व्हायरल) आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरटी एक सर्दी, खोकला आणि तापाचा रुग्ण पाहण्यास मिळतो. सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) या लक्षणांच्या रुग्णांनी ओसंडून वाहत असतो.

Fever, body aches, tension in the elderly, problems in the immunocompromised, overcrowding in the OPD | ताप, अंगदुखीचे ज्येष्ठांना टेन्शन, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना त्रास, ओपीडीत गर्दी

ताप, अंगदुखीचे ज्येष्ठांना टेन्शन, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना त्रास, ओपीडीत गर्दी

googlenewsNext

मुंबई - गेल्या काही महिन्यांत विषाणूजन्य (व्हायरल) आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घरटी एक सर्दी, खोकला आणि तापाचा रुग्ण पाहण्यास मिळतो. सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) या लक्षणांच्या रुग्णांनी ओसंडून वाहत असतो. कारण तीन ते चार दिवसांत हा आजार बरा होतो. यामध्ये विशेष करून, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या ज्येष्ठांना मात्र हा त्रास झाल्याने त्यांना मात्र याचा त्रास आठवड्यापेक्षा अधिक जाणवतो. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. हे आजार साधे वाटत असले तरी त्यावर तत्काळ उपाय केले नाहीतर ते बळावण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.      

विशेष म्हणजे, जे. जे. रुग्णालयात ज्येष्ठांची वेगळी ओपीडी तसेच त्याचसाठी स्वतंत्र (जिरियाट्री) वॉर्ड तयार करण्यात आला आहे. 

उपचाराचे प्राेटाेकाॅल
- या ठिकाणी ज्येष्ठांना होणाऱ्या आजारांवर वेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात.  त्यांना लागणाऱ्या औषध उपचार पद्धतीचे वेगळे असे प्रोटोकॉल तयार करण्यात आलेले आहेत.
- सर्दी, ताप, अंगदुखीचे  रुग्ण अधिक आहेत. कोरोनानंतर बहुतांश रुग्णांमध्ये आरोग्य साक्षरता मोठ्या प्रमाणात आली आहे. त्यामुळे काही थोडेसुद्धा लक्षणे जाणवली तर रुग्णालयात धाव घेतात.

राज्यातील रुग्णांवर उपचार
- जे.जे. रुग्णालयात १० रुपयांचा केस पेपर काढून मोफत उपचार दिले जातात. 
-  रुग्णालयात विविध सरकारी योजना आहेत. त्यामध्ये मोफत उपचारही केले जातात. तसेच काही आजार निदान करण्यासाठी ज्या चाचण्या कराव्या लागतात.  विशेष म्हणजे, जे.जे.मध्ये सर्व प्रकारच्या वयोगटातील रुग्ण केवळ मुंबईतूनच नाही तर संपूर्ण राज्यातून येत असतात.   

सरकारच्या नियमाप्रमाणे उपचारासाठी जे दर निश्चित केले आहेत,  त्या सवलतीच्या दरात या ठिकाणी उपचार दिले जातात. तसेच या रोजच्या ओपीडीमध्ये ३० ते ४० टक्के रुग्ण हे सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीचे असतात. बाकीचे हे अन्य आजाराचे असतात. गंभीर रुग्ण हे कॅज्युल्टी विभागात येत असतात. तसेच या रुग्णालयात कुणालाही उपचार नाकारला जात नाही. ओपीडीमध्येही आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी केली जाते. सोमवारी ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या ही अधिक असते.  
-डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, जे.जे. रुग्णालय

Web Title: Fever, body aches, tension in the elderly, problems in the immunocompromised, overcrowding in the OPD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.