4 वर्षीय मुलासह बापाची ट्रेनसमोर उडी, मुलगा वाचला पण बापाचे झाले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:52 IST2022-02-18T16:52:17+5:302022-02-18T16:52:30+5:30
मुंबईच्या विठ्ठलवाडी स्टेशनवरील ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

4 वर्षीय मुलासह बापाची ट्रेनसमोर उडी, मुलगा वाचला पण बापाचे झाले तुकडे
मुबंई: कल्याणमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्या चार वर्षाच्या मुलासह आत्महत्या करण्यासाठी ट्रेनसमोर उडी मारली. या घटनेत बापचा रेल्वेखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, मात्र सुदैवाने मुलगा बचवला. या घटनेत मुलाला साधं ओरखडेही उमटले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी 6.08 वाजता मुंबईला लागून असलेल्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. हायस्पीड डेक्कन क्वीन ट्रेन येत होती, तेवढ्यात स्थानकावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कडेवरील मुलासह रेल्वेखाली उडी घेतली. ही संपूर्ण घटना प्लॅटफॉर्मवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मृताची अद्याप ओळख पटलेली नाही
कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिकी शार्दुल यांनी सांगितले की, रेल्वेने धडकल्यानंतर या व्यक्तीच्या शरीराचे अनेक तुकडे झाले होते. सध्या त्याच्याकडे एकही कागद सापडला नाही, त्यामुळे त्याची ओळख पटलेली नाही. आम्ही बाळाला आमच्याकडे ठेवले आहे, तो पूर्णपणे फिट आहे.