Join us

पत्नी प्रियकरासोबत पळाली, दोघा चिमुकल्याची हत्या करुन पित्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 22:08 IST

पत्नी प्रियकरासमवेत पळून गेल्याने कृत्य, चेंबूर वाशीनाका येथील घटना

मुंबई : पत्नी प्रियकरासमवेत पळून गेल्याने निराश झालेल्या तरुणाने आपल्या दोन चिमुकल्यांची हत्या करीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चेंबूर येथील वाशीनाका माहुल रोड येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. दिनेश सुरेश यादव (वय ३५) असे त्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने तीन वर्षाचा मुलगा प्रणय व दीड वर्षाची मुलगी नेत्रा यांना चॉकलेटमध्ये विष घालून खाण्यास दिले होते. या हद्रयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली असून शोककळा पसरली आहे.

दिनेश यादवच्या या कृत्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसलेतरी पत्नी पळून गेल्याने नैराश्य अवस्थेत होता. त्यामुळे त्याने आपल्याबरोबर मुलांच्या आयुष्याचा अंत केल्याची ची शक्यता पोलिसांनी वर्तविली. माहुल रोड येथील कस्तुरबा नगरातील मॉडेला संकुलाच्या बाजूला रहात असलेल्या दिनेश यादव हा पत्नी व दोन मुलासमवेत काही वर्षापासून रहात होता. तिच्या पत्नीचे एका तरुणाबरोबर अनैतिक संबंध होते. काही दिवसापूर्वी ती त्याच्यासमवेत पळून गेली. त्यामुळे दिनेश निराशावस्थेत होता. नाचक्की झाल्याने त्याची कोणासमोर जाण्यासही तो धजावत नव्हता. रविवारी रात्री त्याने नेत्रा व प्रणय यांना खाण्यात विष घालून खावयास दिले. दोघे निपचिप पडल्यानंतर छताच्या अ‍ॅगलला काळ्या रंगाच्या ओढणीने गळफास लावून घेतला. सकाळी दहा वाजेपर्यत घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्याने खिडकीतून डोकावून पाहिले असताना दिनेशचा मृतदेह लोंबकळत असल्याचे दिसले. पोलिसांना कळवून त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दोन्ही मुलेही निपचिप पडली होती. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद चेंबूर पोलीस ठाण्यात झाली आहे. पत्नी पळून गेल्याने दिनेशने आत्महत्या केली. त्याचबरोबर दोघा चिमुकल्याच्या अंतामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती.

टॅग्स :गुन्हेगारीचेंबूरआत्महत्या