Join us
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाच्या वादात वडिलांवर लोखंडी वरवंट्याने हल्ला; मुलावर पवईत गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:59 IST

या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अक्षय मनोहर सुतार (वय २६) याच्यावर २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई : घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांवर लोखंडी वरवंट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पवई परिसरातील पासपोली व्हिलेज येथे घडली आहे. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर अक्षय मनोहर सुतार (वय २६) याच्यावर २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

जखमी मनोहर सुतार (वय ५३) हे वडापाव विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. ते पवईतील साकीविहार रोड परिसरात वास्तव्यास असून, त्यांच्या कुटुंबात आई शांताबाई, पत्नी लता तसेच दोन मुले सिद्धार्थ आणि अक्षय यांचा समावेश आहे. तक्रारीनुसार, २६ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता लता या कामावरून घरी परतल्या. त्यावेळी मनोहर सुतार आणि मुलगा अक्षय हे घरी उपस्थित होते. 

जेवण बनवण्याची मागणी करत आईशी केले भांडणअक्षय याने आईकडे जेवण बनवण्याची मागणी केली असता, जेवण आधीच तयार असल्याचे तिने सांगितले. मात्र, पुन्हा जेवण बनवण्याच्या मागणीवरून अक्षयने वाद घालण्यास सुरुवात केली.

लता यांनी थकल्याचे सांगितल्याने अक्षय अधिक चिडला आणि त्याने आईला हाताने मारहाण केली. हा वाद सोडवण्यासाठी मनोहर मध्ये पडले असता, अक्षय याने स्वयंपाकात मसाला कुटण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी वरवंट्याने त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.

या हल्ल्यात मनोहर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर आरोपी अक्षय हा घरातून पळून गेला. जखमी मनोहर यांनी पत्नीच्या मदतीने तात्काळ जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Son assaults father with iron pestle over food dispute in Powai.

Web Summary : In Powai, a son attacked his father with an iron pestle during a domestic dispute over food. The father sustained severe head injuries. Police have registered a case against the son, Akshay Sutar, and are investigating the incident.
टॅग्स :गुन्हेगारीपोलिस