मिरा रोड : मिरा-भाईंदर मेट्रो ९च्या कामादरम्यान आतापर्यंत विविध अपघात होऊन अनेकांना दुखपती व मृत्यू झाला असताना शनिवारी आणखी एक अपघात झाला. ६० ते ७० फुटांवरून पडल्याने सुपरवायझरचा मृत्यू झाला आहे.
मिरा रोडच्या साईबाबानगर येथे मेट्रो मार्गिकेवरून लोखंड बाजूला ठेवण्याचे काम मजूर करत होते. त्यावेळी सुपरवायझर फरहान तहजीब अहमद (४२) तेथे उपस्थित होते. पेडलिंगचा धक्का लागू नये म्हणून सरकले अन्...
लोखंडी पेडलिंगचा धक्का लागू नये म्हणून फरहान मागे सरकले असता तोल गेल्याने ते सुमारे ६५ ते ७० फुटाच्या उंचीवरून खाली पडले. त्यांना जखमी अवस्थेत भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या प्रकरणी मिरा रोड पोलिस ठाण्यात मेट्रोचे काम करताना पडल्यामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मेट्रोचे काम एमएमआरडीएने जे कुमार या ठेकेदार कंपनीस दिले आहे.
आवश्यक सुरक्षा उपकरणे आणि उपाययोजनांची तजवीज केली न गेल्याने अपघात आणि मृत्यूच्या घटना आतापर्यंत घडत आल्या आहेत. मात्र, एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
Web Summary : A supervisor died after falling 60 feet during Mira-Bhayandar Metro 9 construction. The incident occurred in Mira Road. Lack of safety measures is suspected.
Web Summary : मीरा-भायंदर मेट्रो 9 के निर्माण के दौरान 60 फीट से गिरने से एक सुपरवाइजर की मौत हो गई। घटना मीरा रोड में हुई। सुरक्षा उपायों की कमी का संदेह है।