भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी

By नितीन पंडित | Updated: January 23, 2023 12:10 IST2023-01-23T12:09:44+5:302023-01-23T12:10:11+5:30

भरधाव ट्रकची पाच-सहा वाहनांना धडक

Fatal accident on Mumbai-Nashik highway at Bhiwandi two injured watch video | भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, दोन जण जखमी

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : दि.२३- भिवंडीतीलमुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास फाटा येथे एका भरधाव ट्रकने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिली असल्याची घटना सोमवारी पहाटे घडली आहे.या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून पाच ते सहा वाहनांचे नुकसान झाले आहेत.

मुंबई नाशिक महामार्गावर पिंपळास फाटा येथे रस्ता ओलांडताना नेहमीच अपघात होत असतात.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महामार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे काम सुरू होते,त्यासाठी एका बाजूने वाहने रोखण्यात आली होती,याच कामा दरम्यान महामार्गावरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अनेक वाहनांनी आपल्या वाहनाची गती मंद केली परंतु तेवढ्यात मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने पाच ते सहा चार चाकी वाहनांना जोरदार धडक देऊन पसार झाला. झालेल्या या अपघातात एका ओला कार वाहनातील दोन जण गंभीर जखमी झाले असून सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवित हानी झालेली नाही.

दरम्यान महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.घटनास्थळी पोलीस यंत्रणा दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

Web Title: Fatal accident on Mumbai-Nashik highway at Bhiwandi two injured watch video