मुंबईत भीषण अपघात; वांद्रे वरळी सी-लिंकवर भरधाव कारची टोलनाक्यावरील वाहनांना धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 23:51 IST2023-11-09T23:50:36+5:302023-11-09T23:51:11+5:30

या अपघातात २ वाहने चक्काचूर झाली, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे

Fatal accident in Mumbai; Speeding car collides with vehicles at toll plaza on Bandra-Worli Sea link | मुंबईत भीषण अपघात; वांद्रे वरळी सी-लिंकवर भरधाव कारची टोलनाक्यावरील वाहनांना धडक

मुंबईत भीषण अपघात; वांद्रे वरळी सी-लिंकवर भरधाव कारची टोलनाक्यावरील वाहनांना धडक

मुंबई – शहरातील वांद्रे वरळी सी लिंकवर आज भीषण अपघात झाला, टोलनाक्यावर भरधाव आलेल्या कारनं टोलनाक्यावर रांगेत असणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात जवळपास ४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनं सी लिंकचा वापर करतात. याठिकाणी उभारण्यात आलेल्या टोलनाक्यावर काही वाहने रांगेत होती. परंतु मागून आलेल्या भरधाव कारने रांगेतील वाहनांना धडक दिली.

या अपघातात २ वाहने चक्काचूर झाली, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. या अपघाताचे नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही. अपघातानंतर तात्काळ स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सध्या पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.

Web Title: Fatal accident in Mumbai; Speeding car collides with vehicles at toll plaza on Bandra-Worli Sea link