फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:39 IST2026-01-02T07:37:52+5:302026-01-02T07:39:44+5:30
या मेळाव्याद्वारे ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील...

फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत ३ जानेवारीला सायंकाळी वरळी येथील एनएससीआय डोममध्ये मेळावा होणार आहे. या मेळाव्याद्वारे ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडतील.
मुंबईच्या विकासाचे भाजप-शिंदेसेनेचे व्हिजन फडणवीस-शिंदे या मेळाव्यात मांडणार आहेत. भाषणामध्ये ते ठाकरे बंधू आणि काँग्रेसला प्रामुख्याने लक्ष्य करतील, अशी शक्यता आहे. मुंबई महापालिकेवरील ठाकरेंचे वर्चस्व संपुष्टात आणण्याचा संकल्प या मेळाव्याद्वारे करण्यात येणार आहे. भाजप, शिंदेसेनेचे मुंबईतील सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी दिली जाईल.
फडणवीस हे भाजपच्या प्रचारासाठी राज्यभर सभा घेणार आहेत. रोज दोन ते तीन सभांमध्ये त्यांची भाषणे होणार आहेत.