Face recognition system for attendance in municipal hospitals | महापालिका रुग्णालयांमध्ये हजेरीसाठी चेहरा ओळख प्रणाली

महापालिका रुग्णालयांमध्ये हजेरीसाठी चेहरा ओळख प्रणाली

मुंबई : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बोटांच्या ठशांद्वारे बायोमेट्रिक हजेरी लावण्याऐवजी आता कर्मचाऱ्यांचे चेहरे ओळखून हजेरी लावणारी नवीन प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीचा प्रयोग नायर रुग्णालयापासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यावरून सुरू असलेला वाद लवकरच मिटण्याची चिन्हे आहेत.
पालिका कर्मचाºयांच्या विरोधानंतर ६ जुलैपासून सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात आली. मात्र यातून पालिका रुग्णालयातील कर्मचाºयांना वगळण्यात आले. यामुळे सोमवारपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा कामगार संघटनांनी दिला होता. दरम्यान, सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयाचा दौरा महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकताच केला. यावेळी त्यांनी कोरोना वॉर्डमध्ये जाऊन कक्षाची पाहणी करीत रुग्णांची विचारपूस केली. मात्र वार्डातील काही चतुर्थश्रेणी कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कर्मचाºयांची उपस्थिती व सेवासुविधांचा आढावा घेतला.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात याबाबत एक बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली. या बैठकीत आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारासू यांच्यासह प्रमुख रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता व  संबंधित अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीत अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक यांनी पालिका रुग्णालयांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बायोमेट्रिक प्रणाली असावी, असे मत व्यक्त केले. 
कर्मचाºयांची उपस्थिती नोंदवण्यासाठी चेहरा ओळख दर्शवणाºया प्रणालीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या प्रणालीच्या सर्व तांत्रिक मुद्द्यांची 
तज्ज्ञ मंडळींद्वारे तपासणी करून प्रायोगिक स्तरावर नायर रुग्णालयामध्ये ही यंत्रणा बसवावी, असे निर्देश महापौरांनी या बैठकीत दिले.

वैद्यकीय कर्मचाºयांसाठी रेल्वे स्थानकाबाहेर 'बेस्ट'सेवा
रेल्वेमार्गावरील जलद स्टेशनवरून रुग्णालयीन कर्मचाºयांना ने-आण करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या बससेवेची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे. याबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे निर्देश महापौरांनी अतिरिक्त आयुक्त यांना यावेळी दिले. यासाठी पुढील आठवड्यापर्यंत सर्व रुग्णालयाच्या प्रमुखांनी आपल्या कर्मचाºयांची त्यांच्या सोयीच्या स्टेशनबाबतचा उल्लेख असलेली यादी सादर करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Face recognition system for attendance in municipal hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.