रेल्वेसेवा पूर्ववत होईपर्यंत शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 05:59 AM2019-08-13T05:59:33+5:302019-08-13T06:00:16+5:30

मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेसेवा सुरळीत नसल्याने, प्रवाशांच्या सोईसाठी एसटीने या मार्गावर जादा बसफे-या सुरू केल्या आहेत.

Extra 32 rounds of Shivneri until the railway service is restored | रेल्वेसेवा पूर्ववत होईपर्यंत शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या

रेल्वेसेवा पूर्ववत होईपर्यंत शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या

Next

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेसेवा सुरळीत नसल्याने, प्रवाशांच्या सोईसाठी एसटीने या मार्गावर जादा बसफे-या सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, शिवनेरीच्या दररोज नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त ३२ अतिरिक्त फेºया सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

कर्जत-लोणावळा दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर अनेक गाड्या रेल्वेने पुढील काही दिवसांसाठी रद्द केल्या. या मार्गावरील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या निर्देशानुसार एसटी महामंडळाने या मार्गावर दोन्ही बाजूंनी (मुंबई-पुणे) रोज शिवनेरीच्या जादा फेºया सोडण्याचे नियोजन केले आहे. मागणीनुसार साध्या बसेससुद्धा या मार्गावर धावणार आहेत.

Web Title: Extra 32 rounds of Shivneri until the railway service is restored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.