राज्यातील ७५० उपनिरीक्षकांच्या पदांना मुदतवाढ, दोन महिन्यांचे अतिरिक्त प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 01:04 AM2019-12-02T01:04:19+5:302019-12-02T01:04:29+5:30

विधानसभा निवडणूक व अन्य कारणामुळे विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.

Extension of two sub-inspector posts in the state, two months additional training | राज्यातील ७५० उपनिरीक्षकांच्या पदांना मुदतवाढ, दोन महिन्यांचे अतिरिक्त प्रशिक्षण

राज्यातील ७५० उपनिरीक्षकांच्या पदांना मुदतवाढ, दोन महिन्यांचे अतिरिक्त प्रशिक्षण

Next

मुंबई : नाशिक पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या उपनिरीक्षकांच्या सत्र क्रमांक ११७च्या तुकडीतील ७५० परिवेक्षणार्थी अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी दोन महिन्यांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या पदांना अतिरिक्त दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला.
विधानसभा निवडणूक व अन्य कारणामुळे विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना १२ महिन्याऐवजी १४ महिने नाशिक येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) २०१६च्या उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेले ७२४ उमेदवार व सत्र क्रमांक ११४ मधील २६ अशा ७५० जणांचे नाशिक येथील अकादमीमध्ये एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी २२ आॅक्टोबर, २०१८ रोजी पाठविण्यात आले होते. नियोजनानुसार त्यांचे २२ आॅक्टोबर, २०१९ रोजी प्रशिक्षण पूर्ण करावयाचे होते. मात्र, त्यांना निवडणूक व अन्य विविध बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा दोन महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावयाचा असल्याने, त्यांना आता १७ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Extension of two sub-inspector posts in the state, two months additional training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस