खर्च वाढला; मुंबईकरांचे केंद्र सरकारला साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 06:46 IST2026-01-31T06:44:15+5:302026-01-31T06:46:07+5:30

Mumbai News: येत्या रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अन्नधान्य, इंधन, औषधे तसेच शिक्षण, आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाढत्या किमतींमुळे घरखर्चाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

Expenses have increased; Mumbaikars complain to the central government | खर्च वाढला; मुंबईकरांचे केंद्र सरकारला साकडे

खर्च वाढला; मुंबईकरांचे केंद्र सरकारला साकडे

मुंबई -  येत्या रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. अन्नधान्य, इंधन, औषधे तसेच शिक्षण, आरोग्य यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाढत्या किमतींमुळे घरखर्चाचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातून थेट दिलासा मिळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

नोकरदार असलेल्या नितीन लता वामन यांनी सांगितले, अत्यावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात.  एकूणचमहागाईचा ताण कमी करणारा, बचतीचे संरक्षण करणारा आणि सर्वसामान्यांचे जीवन परवडणारे बनवणारा अर्थसंकल्प मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

अधिक व्याज दर देण्याची मागणी
राजेंद्र घाडगे हे नोकरदार असून त्यांनी आयकर भरण्याची सध्याची १२ लाख रुपयांची मर्यादा किमान १६ ते १८ लाखांपर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गृहिणी संध्या मनोहर पारायणे यांनी स्वयंपाकाच्या गॅसदरात कपात आणि जीवनावश्यक 
वस्तूंवरील जीएसटी 
कमी करण्याची मागणी केली. गृहिणी संपदा सावंत यांनी निवृत्तिवेतनधारकांना  ठेवीवर अधिक व्याज दर द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Web Title : बढ़ती लागत: मुंबईकरों की केंद्र सरकार से राहत की गुहार

Web Summary : मुंबई के निवासियों को आगामी बजट में कर राहत और नियंत्रित मुद्रास्फीति की उम्मीद है। नागरिकों ने वित्तीय बोझ को कम करने के लिए उच्च आयकर सीमा, आवश्यक वस्तुओं पर कम जीएसटी और पेंशनभोगियों के लिए बेहतर ब्याज दरों की मांग की है।

Web Title : Rising Costs: Mumbaikars Appeal to Central Government for Relief

Web Summary : Mumbai residents anticipate tax relief and controlled inflation in the upcoming budget. Citizens seek higher income tax limits, reduced GST on essentials, and better interest rates for pensioners to ease financial burdens.