कुर्ला मतदारसंघात अनेक समस्या जैसे थे; आमदारांनी पत्रबाजीवर भर दिल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:27 AM2019-09-10T01:27:47+5:302019-09-10T01:28:18+5:30

पाच वर्षांपूर्वी कुर्ला विधानसभा मतदार संघातील मतदारांना जी वचने दिली होती, ती पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

Existing legislators emphasized correspondence rather than work; | कुर्ला मतदारसंघात अनेक समस्या जैसे थे; आमदारांनी पत्रबाजीवर भर दिल्याचा आरोप

कुर्ला मतदारसंघात अनेक समस्या जैसे थे; आमदारांनी पत्रबाजीवर भर दिल्याचा आरोप

Next

कुर्ला मतदारसंघ
या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदारांचीच संख्या अधिक आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेली अनधिकृत बांधकामे आणि राजकारणात अडकलेली नेतेमंडळी यांच्यामुळे या भागाचा नागरी विकास रखडल्याचे चित्र आहे.झोपडपट्टयांचा पुनर्विकासाचा मुद्दाही महत्वाचा आहे. कुर्ल्याला स्कायवॉक नाही , एसआरए प्रश्न, रेल्वे हद्दीतील साबळे नगर, क्रांती नगर,राजीव गांधी नगर झोपड्डयांचा विकास, २२०० घरे आहेत तेथे ५० वर्षांपासून राहत आहेत, त्यांना घरे मिळाले नाहीत. रस्त्याचा प्रश्न बाकी आहे. अनधिकृत पार्किंगचा मुद्दा प्रलंबित आहे़ पाऊस पडल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचते. तसेच वाहतूककोंडीची मोठी समस्या आहे.

आमदाराचे नाव : मंगेश कुडाळकर, शिवसेना
मतदारसंघ : कुर्ला

आमदार कुडाळकर यांनी कार्य अहवालामध्ये अनेक कामे केल्याचा दावा केला आहे , पण कित्येक कामे बाकी आहेत. आमदारांनी मात्र मतदारसंघातील कामे करण्यापेक्षा संबंधितांना पत्र पाठवले. पंचशील नगर भागाला गेल्या पाच वर्षात विद्यमान आमदारांनी एकदाही भेट दिली नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना या भागाची आठवण आली आहे. या भागातील सम्राट अशोक मंडळ सभागृहाचे महिन्यापूर्वी भूमिपूजन केले आहे. खासदार निधीतून हे सभागृह १ प्लस १ बांधण्यात येणार होते. निधीअभावी आता ते बांधणार आहेत. एक महिन्यापूर्वी भूमिपूजन केले आहे असे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत भिसे यांनी सांगितले.

  • घरांचा पूर्णविकास लवकर व्हावा
  • वाहतूकोंडीचा सोडायला हवा
  • प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
  • कुल्यार्ला स्कायवोक



TOP 5 वचनं

  • कुर्ला ,चेंबूर ,चुनाभट्टी येथील समस्या मार्गी लावणार
  • कुर्ला रेल्वेस्टेशन अद्यावत करणार
  • जी कामे केली त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष देणार
  • वाहतूक कोंडी, रहदारीची समस्या सोडविणार


त्यांना काय वाटतं?
पाच वर्षांपूर्वी कुर्ला विधानसभा मतदार संघातील मतदारांना जी वचने दिली होती, ती पूर्ण करण्यावर भर दिला आहे. एवढेच नव्हे तर दिलेल्या आश्वासनातील ९० टक्के प्रश्न सोडवले आहेत. यामध्ये म्हाडाचा विषय आहे, जिल्हाधिकारी हद्दीतील जमिनीच्या पुर्नविकासाचा मुद्दा आहे. इतकेच नव्हे तर स्वदेशी मिलचा प्रश्न आहे़ या कामांचा सातत्याने पाठपुरावा करून रहिवाशांना न्याय मिळवून दिला. तसेच आमदार निधीचा संपूर्ण उपयोग मतदार संघात केला आहे. - मंगेश कुडाळकर आमदार

या भागात सेना आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे समान नगरसेवक आहेत. त्यामुळे सेनेशिवायच्या इतर नगरसेवकांसोबत आमदारांना फारसे जुळवून घेता आले नाही. कामाच्या श्रेयावरून अनेकदा जुंपली. त्यामुळे काही कामे मार्गी लागले नाहीत. काही कामांचा पाठपुरावा करण्यात अपयश आले. येत्या काळात या विकास कामांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.


पाच वर्षांत काय केलं?
मागील पाच वर्षात या मतदार संघात लादीकरण, पेव्हर ब्लॉक , मलनि:स्सारण वाहिनी आदी कामे करण्यात आली. वास्तविकपणे ही कामे पालिकेची आहेत. पण आमदारांनी त्याकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळे इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले.यामध्ये एसआरए प्रकल्प ,रस्ता रूंदीकरण आदी प्रश्न सूटले नाहीत.

१८ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सुटणार
एफएसआय धोरणचा विषय मार्गी लावला , त्यामुळे टिळकनगर येथे समाज मंदिरासाठी ७ कोटी निधी आणला, लवकरच काम सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी जमिनीवर घराची विक्री केल्यास नावावर घेणाऱ्याला ४ ते ५ लाख खर्च येत होता तो आता १० हजांरावर आला आहे . स्वदेशी मिल सन २००० ला बंद पडली होती, सर्व युनियन एकत्र केले आहे,स्वदेशी मिलचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे, असे मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.

हे घडलंय...

  • टिळकनगर येथे समाज मंदिर
  • व्यायाम शाळा व वा़चनालय
  • कुर्ला पुर्व -पश्चिम भुयरी मार्ग
  • लादीकरण,मलनि:सारण पाहणी,शौचालयाची कामे
  • शेल कॉलनी साठी १६० कोटी निविदा मंजूर
  • संत रोहीदस स्मृती शील्प
  • ई - क्लास रुम
  • समाजकल्याण केंद्र, बुद्धविहारे, मंदीर ,शेड,व्यासपिठे


हे बिघडलंय...

  • एसआरए प्रश्न सुटलेला नाही
  • कुर्ला वाहतूककोंडी ‘जैसे थे’ आहे
  • पाणी साचण्याची समस्या सुटली नाही
  • रेल्वे हद्दितील घरांंचा प्रश्न सुटला नाही

Web Title: Existing legislators emphasized correspondence rather than work;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.