EXCLUSIVE : बिग बॉसच्या घरात होणार अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 08:02 IST2018-05-22T07:34:44+5:302018-05-22T08:02:12+5:30
कलर्स मराठीवर सुरू असणाऱ्या 'बिग बॉस' मराठी या शोमध्ये आता आणखी एक स्पर्धक सहभागी होणार आहे.

EXCLUSIVE : बिग बॉसच्या घरात होणार अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एन्ट्री
-अजय परचुरे
कलर्स मराठीवर सुरू असणाऱ्या 'बिग बॉस मराठी' या शोमध्ये आता अजून एक स्पर्धक सहभागी होणार आहे . वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही लवकरच बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे, अशी माहिती 'लोकमत'ला मिळाली आहे.
गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अभिनेत्री हर्षदा खानविलकरने बिगबॉसच्या घरात प्रवेश केला होता. आता त्यात शर्मिष्ठा राऊतची भर पडणार आहे . शर्मिष्ठाने अनेक मराठी मालिका आणि सिनेमामध्ये भूमिका केल्या आहेत.
(रेशमबरोबरचा रोमान्स आला अंगलट, राजेश शृंगारपुरे 'मराठी बिग बॉस'मधून बाहेर)
बिग बॉस मराठी हा शो सुरू होऊन आता जवळपास 1 महिना झाला आहे. बिग बॉस मराठी हा शो सुरू झाल्यापासून स्पर्धकांमुळे या शो ची सध्या खूप चर्चा आहे. अनिल थत्तेची थत्तेगिरी, घरात झालेले 2 गट, मेघा आणि रेशम मधील शाब्दिक युद्ध, रेशम आणि राजेशमध्ये फुललले प्रेमप्रकरण अशा नवनवीन ट्विस्टमुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. बिग बॉसचा मराठीमधला पहिलाच सिझन आहे आणि अंतरंग स्पर्धकांमुळे त्याला प्रतिसादही उत्तम मिळतोय.
(#BiggBoss 'या' काही जोड्यांमुळे गाजली बिग बॉसची अनेक पर्व)
महेश मांजरेकर हा शो लीड करत आहेत. आतापर्यंत विनीत भोंडे, आरती सोळंकी, अनिल थत्ते आणि राजेश शृंगारपुरे हे 4 स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत.