सेंट झेव्हिअर्सच्या 'मल्हार' उत्सवाची उत्सुकता शिगेला; कला, क्रीडा, राजकारण, सिनेमा रंगणार एकाच मंचावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:16 IST2025-08-13T17:15:48+5:302025-08-13T17:16:34+5:30

कॉलेज फेस्टिव्हल सुरू झाले आहेत, अशातच विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मनोरंजन, प्रबोधन, प्रशिक्षण देणाऱ्या मल्हार उत्सवाचे डिटेल्स जाणून घ्या.  

Excitement at St. Xavier's 'Malhar' festival is at its peak; Art, sports, politics, and cinema will be celebrated on one stage! | सेंट झेव्हिअर्सच्या 'मल्हार' उत्सवाची उत्सुकता शिगेला; कला, क्रीडा, राजकारण, सिनेमा रंगणार एकाच मंचावर!

सेंट झेव्हिअर्सच्या 'मल्हार' उत्सवाची उत्सुकता शिगेला; कला, क्रीडा, राजकारण, सिनेमा रंगणार एकाच मंचावर!

संत झेवियर्स कॉलेज, मुंबईच्या प्रतिष्ठित आंतरमहाविद्यालयीन महोत्सव मल्हार २०२५ अंतर्गत 'कॉनक्लेव्ह प्रेस कॉन्फरन्स'ला १ ऑगस्ट रोजी महावि‌द्यालय प्रांगणात उत्साहात सुरुवात झाली. वि‌द्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध गायिका, उ‌द्योजिका आणि काँटेंट क्रिएटर अवंती नागराळ उपस्थित होत्या. बॉस्टनहून मुंबईत परतल्यावर अनुभवलेला सांस्कृतिक बदल, शालेय जीवनातील आरोग्यविषयक संघर्ष आणि त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक कर्तव्याविषयी त्यांनी सखोल विचार मांडत, "कला ही समाजात बदल घडवणारी शक्ती असते," असे सांगून अभ्यास-सर्जनशीलतेच्या समतोलाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमातील मुख्य आकर्षण होते 'कॉनक्लेव्ह २०२५' च्या लाईनअपची घोषणा, ज्याची संकल्पना आहे "लहरः आजची एक लाट, उ‌द्याची क्रांती", ज्याअंतर्गत विविध क्षेत्रांतील दिग्गज वक्ते विद्यार्थ्यांशी आपले अनुभव आणि विचार मांडतील.

कायदा आणि संरक्षण क्षेत्रातून डॉ. सीमा राव, मा. न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि मा. न्या. रेवती मोहिते डेरे सहभागी होणार आहेत; व्यवसाय व साहित्य क्षेत्रात 'बेन्ने'चे सह-संस्थापक अखिल अय्यर आणि श्रिया नारायण तसेच प्रख्यात लेखक अश्विन सांघी मार्गदर्शन करतील; मनोरंजन क्षेत्रात नेटफ्लिक्सवरील 'सारे जहाँ से अच्छा' चे कलाकार प्रतीक गांधी, सनी हिंदुजा, कृतिका कामरा, अनुप सोनी आणि सुहैल नय्यर उपस्थित राहतील. याशिवाय, प्रेक्षकांची विशेष उत्सुकता आदित्य रॉय कपूर यांच्या सत्रासाठी आहे त्यांच्या बहुप्रशंसित अभिनय कारकीर्दीपासून ते साधेपणाने भारावून टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वापर्यंत, हे सत्र रोमांचक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

क्रीडा क्षेत्रातून अमोल मुझुमदार, सुमा शिरूर आणि विशेषतः भाग्यश्री जाधव भारताचा अभिमान असलेली पॅरा-अ‍ॅथलिट, आंतरराष्ट्रीय पदक विजेती आणि पॅरालिम्पिक्समधील ध्वजवाहक आपल्या अदम्य जिद्दीची कहाणी मांडतील. राजकारण आणि सामाजिक कार्य क्षेत्रात सुप्रिया सुळे चार वेळा खासदार, महिलांच्या हक्क आणि शेतकरी प्रश्नांवरील प्रखर आवाज, तसेच लोकांशी जोडलेली आणि परिवर्तनासाठी सातत्याने लढणारी नेत्री -आपल्या विचारांनी उपस्थितांना भारावून टाकतील. मल्हार २०२५ चे मुख्य कार्यक्रम १५ आणि १६ ऑगस्ट रोजी होणार असून, ही प्रेस कॉन्फरन्स त्या दिशेने केवळ संवाद नव्हती, तर 'द वर्ल्ड विदिन' या थीमचा विचारपूर्वक आणि सर्जनशील आरंभ होती; 'कॉनक्लेव्ह २०२५' ही अशी शृंखला असेल जी युवांमध्ये प्रश्न निर्माण करेल, प्रेरणा देईल आणि समाजात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवण्यास प्रवृत्त करेल.

Web Title: Excitement at St. Xavier's 'Malhar' festival is at its peak; Art, sports, politics, and cinema will be celebrated on one stage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.