सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचा डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 11:18 IST2026-03-23T11:17:56+5:302026-03-23T11:18:56+5:30
दानपेटीतील १० ते १२ हजार रुपये चोरल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीवर कर्मचाऱ्याचा डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील दानपेटीतील देणगी चोरणाऱ्या कर्मचाऱ्याला शुक्रवारी दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राजेंद्र पेंडुरकर (५७) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, त्याने दानपेटीतील १० ते १२ हजार रुपये चोरल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
शुक्रवारी सकाळी मंदिरातील सीसीटीव्हीत पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना दानपेटीजवळ राजेंद्र संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. राजेंद्र दानपेटीतून देणगीचे पैसे काढून खिशात टाकताना दिसला. त्यानंतर फुटेज तपासण्यात आले. त्यात राजेंद्र वारंवार दानपेटीतील देणगी चोरताना दिसला. मंदिर प्रशासनाने दादर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.