एल्गार परिषद : हनी बाबू यांना केरळला जाण्याची परवानगी नाही, विशेष NIA कोर्टाने फेटाळला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 06:06 IST2026-03-22T06:05:26+5:302026-03-22T06:06:06+5:30

विशेष न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय शहराबाहेर जाण्यास मनाई आहे.

elgaar parishad honey babu not allowed to go to kerala mumbai special nia court rejects application | एल्गार परिषद : हनी बाबू यांना केरळला जाण्याची परवानगी नाही, विशेष NIA कोर्टाने फेटाळला अर्ज

एल्गार परिषद : हनी बाबू यांना केरळला जाण्याची परवानगी नाही, विशेष NIA कोर्टाने फेटाळला अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी हनी बाबू यांनी केरळमध्ये दोन महिने राहण्याची परवानगी मिळावी यासाठी केलेला विशेष  एनआयए न्यायालयाने फेटाळला. हनी बाबू यांना  मागील महिन्यातच भेटीसाठी परवानगी देण्यात आली होती आणि जर त्यांना आईसोबत राहायचे असेल, तर त्यांनी तिला मुंबईत आणण्याचा विचार करावा, असे न्यायालयाने अर्ज फेटाळताना म्हटले.

 हनी बाबू यांच्या अटकेनंतर पाच वर्षांहून अधिक काळानंतर त्यांना जामीन मिळाला. जामिनाच्या अटींमध्ये त्यांना न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात राहणे आवश्यक आहे आणि विशेष न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय शहराबाहेर जाण्यास मनाई आहे.

ही कारणे आता फारशी महत्त्वाची नाहीत...

या महिन्यात त्यांनी ईद साजरी करण्यासाठी आणि त्यांच्या ८० वर्षीय आईसोबत वेळ घालवण्यासाठी तसेच नुकत्याच झालेल्या पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर वैद्यकीय तपासणीसाठी केरळमध्ये दोन महिने राहण्याची परवानगी मागितली होती. मात्र, दि. १८ मार्च रोजी दिलेल्या आदेशात विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी म्हटले की, आईसोबत ईद साजरी करणे आणि पित्ताशयाच्या ऑपरेशननंतर तपासणी करणे ही कारणे आता फारशी महत्त्वाची नाहीत. कारण मागील महिन्यातच न्यायालयाने आरोपीला केरळला जाऊन आईसोबत राहण्याची आणि शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली होती. आरोपी काहीकाळ आईसोबत राहून आला आहे. आता जर त्याला आणखी काहीकाळ आईसोबत राहायचे असेल, तर त्याने तिला मुंबईत आणण्याचा विचार करावा, असेही न्यायालयाने सांगितले. 

 

Web Title : एल्गार परिषद: हनी बाबू को केरल जाने की अनुमति नहीं, एनआईए कोर्ट ने याचिका खारिज की

Web Summary : एनआईए कोर्ट ने हनी बाबू की केरल में दो महीने रहने की याचिका खारिज कर दी। उसे पहले अपनी मां से मिलने की अनुमति दी गई थी। कोर्ट ने सुझाव दिया कि वह इसके बजाय उसे मुंबई ले आए।

Web Title : Elgar Parishad: NIA court denies Honey Babu permission to visit Kerala.

Web Summary : The NIA court rejected Honey Babu's plea to stay in Kerala for two months. He was previously allowed to visit his mother. The court suggested he bring her to Mumbai instead.