'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 21:57 IST2025-10-27T21:56:35+5:302025-10-27T21:57:41+5:30
आज वरळी डोममध्ये शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मतदार यादीतील गोंधळावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज मुंबईतल्या वरळी डोममध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला मतदार यादीतील गोंधळावरुन सुनावले आणि इशाराही दिला. "त्यांना ओरबाडायचं आहे. संपवून टाकायचं आहे, यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. आपल्यावर जर हुकूमशाही नको असेन तर हीच वेळ आहे.निवडणूक आयोगाला परत सांगतो, चुका दुरुस्त केल्याशिवाय तुम्हाला निवडणुका घेता येणार नाहीत",असा इशाराही ठाकरेंनी दिला.
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
"लोकसभेमध्ये यश मिळाले, विधानसभेत २० जागा? हरू शकतो आपण. मी कोव्हिडमध्ये मुस्लिमांसह सर्वांबरोबर समानतेने वागलो. तो मतदार माझ्याशी उरफाटा वागू शकत नाही. हा मतदारांचा कौल नाही. हा यांच्या पैशांचा माज आहे उद्या यांचे चटर फटर लोक चिरकतील, चिरकू द्या, उत्तरं देऊ नका. त्यांना त्याचा पगार मिळतो. ते आपल्याला डिस्टर्ब करतात. ते नामर्द आहेत म्हणून आपल्याच लोकांना तोडून फोडून आपल्यावर पाठवत आहेत. आपल्याच दोन माणसांमध्ये भांडणं लावत आहेत, असा निशाणाही ठाकरेंनी भाजपाला लगावला.
'मुंबईवर दोन व्यापाऱ्यांच डोळा आहे, आजच एकच येऊन गेला. सामनात दोन बातम्या पाहिल्या, भाजप कार्यालयाच भूमिपूजन आणि दुसरी बातमी राणीच्या बागेत अँनाकोंडा आणला जाणार, आज तसाच एक येऊन गेला, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.