'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 06:56 IST2026-01-13T06:17:31+5:302026-01-13T06:56:02+5:30
नवीन लाभार्थी निवडण्यासही मनाई केली आहे.

'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लाडकी बहीण' योजनेंतर्गत जानेवारीचा १,५०० रुपयांचा आगाऊ हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मनाई केली. तसेच नवीन लाभार्थी निवडण्यासही मनाई केली आहे.
योजना असल्याने डिसेंबर २०२५ या महिन्याची १,५०० रुपयांची रक्कम देण्यास आयोगाने परवानगी दिली. १५ जानेवारीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने तसे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
काँग्रेसच्या तक्रारीवर निर्देश
महाजन यांच्या पोस्टनंतर काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे ३००० रुपये एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब १ कोटीहून अधिक महिला मतदारांना करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. ही एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच असून, यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे, असे आयोगाला पाठवलेल्या पत्रात काँग्रेस म्हटले होते.