Eknath Shinde: मराठीत सुरुवात, हिंदीत फटकेबाजी अन् 'इंग्लिश कोट' देत मुख्यमंत्र्यांचं भाषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 20:09 IST2022-07-08T20:07:52+5:302022-07-08T20:09:57+5:30
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती शासन राज्यातील उद्योगासमोरील अडीअडचणी दूर करून उद्योगाभिमुख राज्य ही आपली ओळख नव्याने सार्थ ठरवेल

Eknath Shinde: मराठीत सुरुवात, हिंदीत फटकेबाजी अन् 'इंग्लिश कोट' देत मुख्यमंत्र्यांचं भाषण
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारच्या संकल्प से सिद्धी या उपक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी, भाषण करताना मराठीत सुरुवात करत हिंदीत फटकेबाजी केली. तर, अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा एक इंग्लिश कोटही सांगितला. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या संकल्प से सिद्धी या कार्यक्रमात सहभागी होऊन राज्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांचं त्यांनी स्वागत केलं. तसेच, गडकरी यांनी केलेल्या कामाची माहिती दिली.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती शासन राज्यातील उद्योगासमोरील अडीअडचणी दूर करून उद्योगाभिमुख राज्य ही आपली ओळख नव्याने सार्थ ठरवेल, अशी ग्वाही यासमयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, नितीन गडकरी हे आमचे मार्गदर्शक असून त्यांचं यापुढेही आम्हाला मोलाचा मार्गदर्शन राहिल, असा विश्वास व्यक्त केला. सन 1995-99 मध्ये युती सरकारच्या काळात गडकरींच्या नेतृत्त्वात मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेचं काम पूर्ण झालं. त्यामुळे, प्रवासाला लागणारा वेळ कमी झाला. तसेच, मुंबईत 53 उड्डाण पूल बांधण्यात आले, आता ते 53 पूलही कमी वाटतात. यावरुन, नितीन गडकरी हे किती दूरदृष्टी असलेले नेते आहेत, असेही शिंदेंनी म्हटले.
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना - भाजप युती शासन राज्यातील उद्योगासमोरील अडीअडचणी दूर करून उद्योगाभिमुख राज्य ही आपली ओळख नव्याने सार्थ ठरवेल अशी ग्वाही यासमयी बोलताना दिली. pic.twitter.com/SdgutML0O8
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2022
एकनाथ शिंदेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठीत बोलतो असे म्हणत थोडं मराठीत भाषण केलं. त्यानंतर, हिंदीत फटकेबाजी केली. यावेळी, रस्ते आणि महामार्गाचं उदाहरण देताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा एक कोटही सांगितला. ''अमेरिकन रोड्स आर गुड, नॉट बिकॉस वुई आर रीच, बट वुई आर रीच बिकॉस अमेरिकन रोड्स आर गुड'', असा कोट एकनाथ शिंदे यांनी सांगितला. तसेच, त्याचा मराठी अर्थही यावेळी त्यांनी सांगितला. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते नीट नाहीत, तर येथील रस्ते नीट आहेत, म्हणूनच अमेरिका श्रीमंत आहे, असा आशयही त्यांनी सांगितला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा तिहेरी मिलाप दिसून आला. दरम्यान, राज्यात सुरू असेलल्या विविध कामांची माहिती देताना समृद्ध महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार असल्याचेही ते म्हणाले.