एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, पेपर वाचतानाचा फोटो शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 14:22 IST2023-11-09T13:20:27+5:302023-11-09T14:22:39+5:30

आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने ४ दिवसांपूर्वी त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Eknath Khadse's condition is in good health, information was shared by sharing a photo of him reading a paper | एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, पेपर वाचतानाचा फोटो शेअर करत दिली माहिती

एकनाथ खडसेंची प्रकृती ठणठणीत, पेपर वाचतानाचा फोटो शेअर करत दिली माहिती

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकृती आणि डेंग्युबद्दल माहिती देत राज्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, आता माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे यांनीही प्रकृतीबद्दल अपडेट देत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना छातीत दु:खत असल्याने त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल होते. आता, त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांनी पेपर वाचतानाचा स्वत:चा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत दिसून येते. 

आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने ४ दिवसांपूर्वी त्यांना जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर पुढील तपासण्या झाल्या. तत्पूर्वी, मुक्ताईनगरला खडसेंच्या छातीत दुखायला लागले. त्यांना गजानन हार्ट हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. तिथे, त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती. आता,  त्यांनी स्वत: प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे. तसेच, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र, आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल. प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठीशी उभे राहतात. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद !
महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधु-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !, असे ट्विट एकनाथ खडसे यांनी केले आहे. 

शरद पवारांनी घेतली भेट

दरम्यान, सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रसेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन एकनाथ खडसेंच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यावेळी, खडसे यांच्या पत्नी मंदिकीनी खडसे ह्याही उपस्थित होत्या. शरद पवार यांनी खडसेंसोबत संवाद साधला, त्यावेळी खडसेंनीही त्यांच्याशी बातचीत केली होती. या भेटीचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी ट्विटरवरुन शेअर केला होता. 

 

Web Title: Eknath Khadse's condition is in good health, information was shared by sharing a photo of him reading a paper