Eknath Khadse to be present at ED office today! | एकनाथ खडसे आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार!

एकनाथ खडसे आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भोसरी येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना शुक्रवारी चौकशीस कार्यालयात हजर राहण्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजाविले आहे. 

ईडीने खडसे यांना ३० डिसेंबरला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजाविले. मात्र, त्यांना कोरोनासदृश आजाराची लागण झाली. त्यामुळे त्यांना १४ दिवसांनंतर चौकशीस बाेलावण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना १५ जानेवारीला सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे समन्स बजाविले. त्यानुसार शुक्रवारी ते कार्यालयात हजर होतील, असे सूत्रांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Eknath Khadse to be present at ED office today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.