Join us  

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; नवाब मलिक म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 11:22 AM

गेल्या ५ वर्षात एकनाथ खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.

मुंबई: भाजपाचे नेते एकनाथ खडसे गेल्या अनेक दिवसांपासून नारज भाजपावर नाराज आहेत. एकनाथ खडसे यांनी अनेकवेळा नाराजी देखील बोलून दाखवली. तसेच भाजपात बंडखोरी करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे. त्यातच नागपूरमध्ये एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याची शक्यात वर्तवली जात होती. त्यामुळे खडसे भाजपाला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करुनही माझ्यावर अन्याय झाला अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा सवाल विचारला जात आहे. खडसे भाजपवर नाराज आहेत. पण त्यांचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय अद्याप झाला नसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. ज्यांनी ४० वर्ष पक्षासाठी झटलो त्यांना अशी वागणूक का? आम्ही बाहेर पडत नाही तर आम्हाला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात असा आरोप एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. 

टॅग्स :एकनाथ खडसेनवाब मलिकभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार