Join us

८५ % पालकांना आता वाटत आहे त्यांच्या मुलांच्या भविष्याची जास्त चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 17:05 IST

लीड स्कूल सर्वेक्षणाचा निष्कर्ष : मुलांचे आरोग्य , त्यांची सुरक्षा आणि शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची पालकांना सगळ्यात जास्त चिंता

 

 

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिशु वर्गांपासून बारावीपर्यंतच्या मुलांच्या पालकांना खूप मोठी चिंता भेडसावू लागली आहे.  ईद स्कुल या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून कोविड साथीच्या काळात समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या स्थितीमुळे आपल्या मुलांच्या भविष्याबाबत ८५% पेक्षा जास्त पालकांना आता अजून जास्त काळजी वाटू लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान या महामारीच्या काळात महाराष्ट्रातील ५० % अधिक पालकांना ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग फिझिकल डिस्टंसिंगच्या दृष्टीने सुरक्षित असल्याचे वाटत असल्याचे सर्वेक्षणातून  समोर आले आहे.लीड स्कुलने देशातील महानगरे आणि इतर शहरांमधील जवळपास ५००० पालकांसोबत केल्या गेलेल्या या राष्ट्रव्यापी सर्वेक्षणातून  ७०% पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर कोविडमुळे होत असलेल्या प्रभावामुळे खूप काळजीत असल्याचे समोर आले आहे. विशेषतः नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक थोडे जास्त चिंतीत झाले आहेत; सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पालकांपैकी ७८% पेक्षा जास्त पालकांना आपल्या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत चिंता वाटत आहे. तर  जवळपास ४०% पालकांनी त्यांची मुले अभ्यासात मागे पडतील आणि त्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाईल अशी भीती व्यक्त केली आहे.लीड स्कूलकडे असलेल्या माहितीनुसार एकीकडे मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरयाणामधील पालक असे मानतात की ते आपल्या मुलांना शिक्षणात मदत करण्यात चांगल्या प्रकारे सक्षम नाहीत तर दुसरीकडे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि तेलंगाणा येथील पालक मानतात की, ते आपल्या मुलांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी सक्षम आहेत. विशेषतः  महाराष्ट्रातील ८४% पालक आपल्या मुलांसोबत जास्त चांगल्या प्रकारे वेळ घालवण्यात सक्षम असल्याचे सांगतात. सर्वेक्षणदरम्यान मोठ्या आणि छोट्या दोन्ही प्रकारच्या शहरांमध्ये ही बाब आढळून आली आहे.  या सर्वेक्षणादरम्यान लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे आपल्या देशात ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहेहे समोर आले आहे. महाराष्ट्रातील ५०% पेक्षा जास्त पालकांनी ऑनलाईन शाळा हा शिक्षणाचा प्रभावी मार्ग असून शाळेच्या वर्गांमध्ये बसवून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरीनेच ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवले गेले पाहिजे असे मत मांडले आहे. ५३% पालकांनी यामुळे ते आपल्या मुलांना घरून चालणाऱ्या ऑनलाईन शिक्षणात मदत करू शकतात अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

आपल्या शाळांनी उच्च गुणवत्तापूर्ण ऑनलाईन शिक्षण अनुभव प्रदान करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून जर आपण आपल्या मुलांना शाळांमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेत असू तर त्यांचे काही नुकसान होणार नाही.  पण त्याचवेळी ज्यांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे आहे त्यांच्या निर्णयाचाही आदर करायला हवा. शाळांमध्ये नियमांचे पालन होत आहे याची खात्री करून घेण्यासाठी सरकारने नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि ज्या शाळा नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली गेली पाहिजे- सुमीत मेहता, सह संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी , लीड स्कुल

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्रकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस