आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 08:44 IST2026-04-08T08:44:07+5:302026-04-08T08:44:45+5:30

कांदिवली-चारकोप भागात मंगळवारी दुपारी घडली दुर्घटना

Eight-year-old girl crushed to death by dumper; Angry citizens block road, driver arrested | आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक

आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांदिवली-चारकोप भागात मंगळवारी दुपारी डम्परखाली चिरडून आठ वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. कृतिका सुनील चौहान (८) असे तिचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. त्यानंतर, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

कृतिकाचे कुटुंब गणेशनगरमध्ये राहते. ती महापालिका शाळेत इयत्ता पहिलीत होती. तिच्या आईची नुकतीच प्रसूती झाल्यामुळे ती तिला शाळेत सोडायला आली नव्हती. त्यामुळे कृतिका मैत्रिणींसह ऑस्कर रुग्णालयाच्या मागे असलेल्या शाळेत निघाली होती. गणेशनगरमधील आयएमपी सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या डम्परखाली ती चिरडली आणि जागेवरच गतप्राण झाली.

अपघाताची वार्ता संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी रस्ता अडवला. या घटनेची माहिती मिळताच, चारकोप पोलिसांसह कांदिवली पोलिस ठाण्यातील अधिकारी दाखल झाले. त्यानंतर, जखमी कृतिकाला रुग्णालयात नेण्यात आले, तसेच पोलिसांनी संतप्त जमावाला नियंत्रणात आणले आणि घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला.

Web Title : मुंबई में डंपर से कुचलकर आठ वर्षीय बच्ची की मौत; ड्राइवर गिरफ्तार।

Web Summary : मुंबई के कांदिवली में एक डंपर ने आठ साल की बच्ची को कुचल दिया, जिससे उसकी मौत हो गई। इस घटना से गुस्साए स्थानीय लोगों ने विरोध प्रदर्शन किया, जिसके बाद ड्राइवर को गिरफ्तार कर लिया गया। पीड़िता पहली कक्षा की छात्रा थी और दोस्तों के साथ स्कूल जा रही थी तभी निर्माण स्थल के पास यह हादसा हुआ।

Web Title : Eight-year-old girl crushed by dumper in Mumbai; driver arrested.

Web Summary : An eight-year-old girl died after being run over by a dumper in Kandivali, Mumbai. The incident sparked protests by angry locals, leading to the arrest of the driver. The victim, a first-grade student, was on her way to school with friends when the accident occurred near a construction site.