Join us  

सत्ताबदलाचा परिणाम; बारामतीकरांची पाणीकोंडी दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 3:53 AM

सत्ताबदलाचा परिणाम; निरा कालव्यातील पाण्याचे समन्यायी वाटप

मुंबई : राज्यातील सत्ताबदलानंतर माढा लोकसभा मतदारसंघावर बारामती भारी पडली आहे. निरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नीरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे बारामतीसाठी बंद झालेल्या निरा डावा कालव्याच्या पाण्याचा मार्ग खुला झाला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बारामतीला जाणाऱ्या डाव्या कालव्याचे पाणी माढ्याचे खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्या आग्रहाखातर थांबवण्यात आले होते. मात्र नीरा देवधर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक रहाणारे पाणी निरा उजवा आणि डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्राला समान पध्दतीने देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रीमंडळ बैठकीत करुन घेतला आहे. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रातील सगळ्यांना होईल. डाव्या कालव्यात ५५ टक्के तर उजव्या कालव्यात ४५ टक्के पाणी सोडले जाईल. 

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसपाणी