वॉशिंग मशीनमध्ये लपविले नोटांचे बंडल, १८०० कोटींचा घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 06:30 AM2024-03-28T06:30:10+5:302024-03-28T06:30:31+5:30

शिपिंग कंपनी संचालकाच्या घरी ईडीचा छापा

ED seizes crores in cash from washing machine during searches | वॉशिंग मशीनमध्ये लपविले नोटांचे बंडल, १८०० कोटींचा घोटाळा

वॉशिंग मशीनमध्ये लपविले नोटांचे बंडल, १८०० कोटींचा घोटाळा

मुंबई : काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठविल्याचा आरोप असलेल्या मुंबईस्थित एका शिपिंग उद्योगातील कंपनीवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथे ही छापेमारी झाली आहे. मात्र, दक्षिण मुंबईत झालेल्या छापेमारीदरम्यान त्याने लाखो रुपयांची रोख रक्कम वॉशिंग मशीनमध्ये आढळली. छापेमारीदरम्यान एकूण २ कोटी ५४ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी संबंधित कंपनीची एकूण ४७ बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

मुंबईस्थित कॅप्रिकॉर्नियन शिपिंग अँड लॉजिस्टिक या कंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला आणि संजय गोस्वामी यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १८०० कोटी रुपये मूल्याचे परकीय चलन परदेशात पाठवल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. या प्रकरणी ईडीने परदेशी चलन विनिमय कायद्यांतर्गत (फेमा) तपास सुरू केला आहे.

या छापेमारीदरम्यान कॅप्रिकॉर्नियन कंपनीशी संबंधित अन्य पाच कंपन्यांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. हे पैसे या लोकांनी सिंगापूरस्थित कंपनीला पाठविल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

Web Title: ED seizes crores in cash from washing machine during searches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.