ED raids on Jet Airways founder Naresh Goyal's homes in Delhi, Mumbai | जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या दिल्ली, मुंबईतील घरांवर ईडीचे छापे

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या दिल्ली, मुंबईतील घरांवर ईडीचे छापे

मुंबई - जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या दिल्ली आणि मुंबई येथील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. जेट एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एतिहाद एअरवेजकडून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीची ईडी चौकशी करत आहे. 

तपास यंत्रणेचं म्हणणं आहे की, 2014 मध्ये जेट एअरवेजमध्ये झालेल्या गुंतवणुकीत परदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केलं आहे. जेट एअरवेजवर 8500 कोटीपेक्षा अधिक कर्ज आहे. यात कर्मचाऱ्यांचा पगार जोडला तर ही रक्कम 11 हजार कोटींपर्यंत जाते. यापूर्वीही जेट एअरवेजचे संस्थापक नरेल गोयल यांना गुरूवारी तपास यंत्रणांनी फसवणुकीच्या प्रकरणाखाली चौकशी केली. जेट एअरवेजमधील 18 हजार कोटींच्या कथित आर्थिक व्यवहारामधील अनियमितता यावर गोयल यांना प्रश्न विचारण्यात आले. 

याआधी जेटमध्ये २४ टक्के भागीदारी असलेल्या एतिहादच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते की, भारताच्या जेट एअरवेजमध्ये काही अटींवर पुन्हा गुंतवणूक करण्याचा विचार सुरू आहे. परिवहन क्षेत्रात भारत जगात वेगाने वाढत आहे. यूएईचा आर्थिक सहकारी देश म्हणूनही भारताकडे पाहिले जाते. आम्ही एअरवेजचे मुख्य गुंतवणूकदार बनू इच्छित नाहीत. याशिवायही गुंतवणूकदारांना पुढे यावे लागेल. यात फेरभांडवलीकरण व्हायला हवे. एतिहादशिवाय नॅशनल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड (एनआयआयएफ), टीपीजी कॅपिटल आणि इंडिगो यांनाही गुंतवणुकीबाबत अपेक्षा आहेत.


एतिहादने हे स्पष्ट केले नाही की, जेट एअरवेजमध्ये जर एखाद्या कंपनीने अधिक भागीदारी खरेदी केली, तर त्यांच्यासोबत ते काम करतील का? इंडिगो आणि स्पाईसजेटसोबत स्पर्धा करणाऱ्या आणि भारतातील प्रमुख कंपन्यांपैकी एक असणाºया जेटची आर्थिक स्थिती अलीकडच्या काळात अधिक बिघडत गेली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ED raids on Jet Airways founder Naresh Goyal's homes in Delhi, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.