Join us

अनिल परब यांना ईडीची नोटीस; चौकशीसाठी उद्या हजर राहण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 07:08 IST

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावत येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्याने चर्चेत आलेले राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर आता केंद्रीय तपास यंत्रणेने नजर वळवली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना समन्स बजावत येत्या मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.

१०० कोटी वसुली व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याने एनआयए कोठडीतून लिहिलेल्या पत्राच्या अनुषंगाने त्यांना समन्स पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यासाठी साधलेल्या ‘टायमिंग’मुळे चर्चेला उधाण आले आहे. 

टॅग्स :अनिल परबअंमलबजावणी संचालनालय