ईडीकडून आमदार प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 07:44 AM2020-12-11T07:44:50+5:302020-12-11T07:45:24+5:30

Pratap Saranaik News : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवारी सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली.

ED interrogates MLA Pratap Saranaik for six and a half hours | ईडीकडून आमदार प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी

ईडीकडून आमदार प्रताप सरनाईक यांची साडेसहा तास कसून चौकशी

Next

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टॉप सिक्युरिटीज कंपनीच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची गुरुवारी सुमारे साडेसहा तास कसून चौकशी केली. त्यांच्या विविध व्यवसायातील गुंतवणुकीबरोबरच कौटुंबिक व राजकीय भूमिकेबद्दल अधिकाऱ्यांकडून प्रश्नांचा भडीमार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, चौकशी खेळीमेळीच्या वातावरणात झाली असून त्यांनी पुन्हा बोलविल्यास हजर होऊन सहकार्य करू, असे सरनाईक यांनी सांगितले.

ईडीने २४ नोव्हेंबरला सरनाईक यांच्या ठाणे व मुंबईतील घर व कार्यालयावर छापे टाकले होते. त्यांच्या टॉप्स सिक्युरिटीज ग्रुपमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची तक्रार आल्याने ही कारवाई करण्यात आली. त्यांचा मुलगा विहंग यांना ताब्यात घेऊन ५ तास चौकशी केली होती. मात्र त्यांनतर अनेकदा समन्स बजावूनही सरनाईक पिता-पुत्रांनी कार्यालयात जाण्याचे टाळले होते. त्यानंतर गुरुवार, १० डिसेंबरला हजर राहण्यासाठी नोटीस बजाविली हाेती.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सरनाईक यांना अटक न करण्याचे निर्देश ईडीला दिले होते. त्यानंतर सरनाईक गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास बेलार्ड पियार्ड येथील ईडीच्या कार्यालयात हजर झाले. आधिकाऱ्यांनी त्यांचे व्यवसाय, टॉप्स सिक्युरिटीज कंपनीसह विविध कंपन्यातील आर्थिक गुंतवणूक, वार्षिक उलाढालीबद्दल माहिती विचारली. जकीय, सामाजिक व कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेतली. साडेपाचच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. 
दरम्यान, सरनाईक यांचे निकटवर्तीय व टॉप्स सिक्युरिटीज समूहाचे प्रवर्तक अमित चांडाेळे यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

Web Title: ED interrogates MLA Pratap Saranaik for six and a half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.