Join us

शिवसेना खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक; ईडीची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 13:28 IST

जमीन घोटाळा प्रकरणी प्रविण राऊत यांना अटक

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयानं ही कारवाई केली आहे. प्रविण राऊत एचडीआयएलची सहाय्यक कंपनी असलेल्या गुरुआशिष कंस्ट्रक्शनमध्ये संचालक आहेत.गोरेगाव भूखंडाच्या विक्रीत एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे नातेवाईक आहेत. १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीच्या पथकानं काल (मंगळवारी) प्रवीण यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी झडती घेतली होती. त्यानंतर त्यांना दक्षिण मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. त्यांची अनेक तास चौकशी केली. मात्र, चौकशीला सहकार्य करण्यास नकार दिल्यानंतर ईडीनं राऊत यांना अटक केल्याची माहिती आहे.

याआधी प्रविण राऊत यांचं नाव डिसेंबर २०२० मध्ये पीएमसी बँक घोटाळ्यात आलं होतं. प्रविण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाखांचं व्याजमुक्त कर्ज दिलं होतं. याचा वापर त्यांनी मुंबईतील दादरमध्ये एक फ्लॅट खरेदी करण्यासाठी केला.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयसंजय राऊत