Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवनंतर खा. पटोले राहुल गांधींनाही भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 06:06 IST

मुंबई : भाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतक-यांच्या प्रश्नांवर भेट घेतली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपाचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी शुक्रवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतक-यांच्या प्रश्नांवर भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या भेटीत यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशकांमुळे झालेल्या शेतकºयांच्या मृत्यूंची चौकशी संयुक्त संसदीय समितीने करावी, या पटोले यांच्या मागणीचे ठाकरे यांनी समर्थन केले.अर्धा तासाच्या या भेटीनंतर पटोले यांनी पत्रकारांना सांगितले की, यवतमाळच्या प्रकरणी आपण लवकरच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहोत. उद्धव ठाकरे हे लवकरच यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार असून त्या दौºयात आपण त्यांच्यासोबत राहू.पटोले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कडेकोट पोलीस बंदोबस्तात अन् स्थानिक मंत्र्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री यवतमाळला गेले आणि घाईघाईत परतले, असा आरोप त्यांनी केला.यवतमाळच्या शेतकरी मृत्यूंची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करावी, या मागणीला समर्थन देणारी पत्रे शिवसेनेचे खासदार देतील, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिला, असे खा.पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :नाना पटोलेभाजपाउद्धव ठाकरे